Thursday, September 10, 2009

कुलवधू - उखाणे

.......... उल्हास भिडे (५-९-०९)

माझी पहिली कविता

माझी पहिली कविता


अचानक आल मनात
आपण एक कविता करावी
कागदावरती खरडून काही
लोकांची वाहवा मिळवावी


बराच वेळ प्रयत्न केला
फारस काही जमल नाही
कधी चुकायचा छंद तर
कधी यमक जुळल नाही

निराश होउन बसलो असता
अंतर्मनी उठे हुंकार
हुंकार नव्हे तो जणू
प्रतिभेचा (???) साक्षात्कार

माझ मन मला म्हणालं
कशाला छंदाच्या फंदात पडतोस
यमक आणि मात्रांचे त्या
नसते हिशोब का मांडतोस

कशाला इतका गहन विचार
कविता थोडीच गायची असते ?
खरं तर जी गाता येते
ती मुळीच कविता नसते

कविता म्हणजे कशी असावी
कागदावर ती Zigzag दिसावी
Cardiogram ची उभी धरलेली
एक जणू Strip भासावी

मनाने मला दीक्षा दिली
क्षणात माझी प्रतिभा (?) जागली
सांगितलेल्या Recipe नुसार
माझी कविता छान शिजली

काय केल :-- डोक्यातले विचार
८-१० ओळीत गद्यात लिहिले
तेच शब्द तोडून मोडून
Zigzag रूपात परत रचले

कविता चवदार करण्यासाठी
काही अगम्य गोष्टी मिसळल्या
जसं :-- "मिट्ट काळोखाच्या रात्री
उन्हाच्या त्या सावल्या दाटल्या",

“वसंतातली पानगळ, भाजणारं चांदण”,
“निस्तेज डोळ्यातली भेदक नजर”,
“रणरणत्या उन्हात थिजलेले रस्ते”,
“माझंच प्रेत माझ्याच खांद्यावर”,

“तिच्या ह्रुदयात सुकलेले अश्रू”,
“प्रतारणेतून डोकावे विश्वास”,
“प्रकाशझोत ये अंधारून”,
“कलेवराचे धगधगते उच्छ्वास”.

असल्या एक एक चीजा घालून
कवितेची Dish तयार झाली
शोभेसाठी मग तिच्यावर
विराम चिन्हं Garnish केली

आणि कुठल्याशा मासिकाला
त्याच दिवशी पाठवून दिली
आणि काय सांगू मित्रांनो
पुढ़च्याच महिन्यात छापून आली

मग काय ! अभिनंदनाचा वर्षाव !
सगळ्यानी माझी स्तुती केली
मराठीच काय अमराठी मित्रांनी
कविता माझी नावाजली

“Mind blowing”, “Superb”, “Awesome”
“बहोत बढ़िया”, “माशाल्ला”,
“सुंदर”, “अप्रतिम”, “अर्थपूर्ण”
कौतुकाने जीव गलबलला

कौतुकाची लाट ओसरली
मग जरा भानावर आलो
डोकं खाजवून विचार केला
आणि बुचकळ्यातच पडलो

तथाकथित कवितेचा अर्थ
अजून मलाच नाही कळला
फक्त एकदा वाचून (की पाहून ?) यांना
कसा काय तो उमगला ???????

........ उल्हास भिडे (४-९-०९)

असूया

असूया
सदान् कदा पाहतो तुला, त्याला बिलगलेली
इतकी सलगी का ग त्याने, काय जादू केली ?
तो तुझ्या समीप, नि मी मात्र दूर
असे का ग होते, मनी उठते काहूर
साद त्याची ऐकायाला, किती तू अधीर
येता त्याची हाक कानी, धावशी सत्वर
त्याची हाक झेलायला, कधीच तू चुकत नाहीस
मी फोडला टाहो तरी, ढुंकुन देखील बघत नाहीस
तुझा स्पर्श संग त्याला, लाभे येता जाता
माझ्याच का नशिबी या, कोरडया कविता
तुझे गाल, तुझे ओठ, तुझं चुंबन
आम्ही स्वप्नातच अनुभवायच
त्या पठ्ठ्याने मात्र या सर्वावर
स्वामित्व गाजवायच ?

वार्‍याशी खेळणाऱ्या तुझ्या अवखळ बटा
मी दुरूनच पाहतो
त्याच वेळी तुझ्या कुंतलातून
तो वाकुल्या दाखवतो
गाली त्याच्या गाल घासून, कसलं हितगुज करतेस ?
लाडे लाडे बोलताना तू , मानाही वेळावतेस
जेव्हा तुझी नाजुक बोटं, त्याच्या सर्वांगी फिरतात
असूयेच्या लाखो मुंग्या, माझ्या मना डसतात
मी चिडतो, रागावतो, जळफ़ळतो
मत्सराने पेटून उठतो
काहीही करू शकत नाही
म्हणुन देवाला
विचारतो

काय देवा त्याच पुण्य ? त्याला झुकतं माप दिलस
माझ्या भाळी मात्र का हे, असल फुटकं नशीब लिहिलस
माणसाचा जन्म देऊन, का रे असल दुःख दिलस ?
देवा मला त्याच्यासारख, सांग mobile का नाही केलस ?

........ सांग mobile का नाही केलस ?

......... उल्हास भिडे (२६-८-२००९)






दीनानाथ आजोबांचे समारोपाचे भाषण (असंभव)