Thursday, September 10, 2009

माझी पहिली कविता

माझी पहिली कविता


अचानक आल मनात
आपण एक कविता करावी
कागदावरती खरडून काही
लोकांची वाहवा मिळवावी


बराच वेळ प्रयत्न केला
फारस काही जमल नाही
कधी चुकायचा छंद तर
कधी यमक जुळल नाही

निराश होउन बसलो असता
अंतर्मनी उठे हुंकार
हुंकार नव्हे तो जणू
प्रतिभेचा (???) साक्षात्कार

माझ मन मला म्हणालं
कशाला छंदाच्या फंदात पडतोस
यमक आणि मात्रांचे त्या
नसते हिशोब का मांडतोस

कशाला इतका गहन विचार
कविता थोडीच गायची असते ?
खरं तर जी गाता येते
ती मुळीच कविता नसते

कविता म्हणजे कशी असावी
कागदावर ती Zigzag दिसावी
Cardiogram ची उभी धरलेली
एक जणू Strip भासावी

मनाने मला दीक्षा दिली
क्षणात माझी प्रतिभा (?) जागली
सांगितलेल्या Recipe नुसार
माझी कविता छान शिजली

काय केल :-- डोक्यातले विचार
८-१० ओळीत गद्यात लिहिले
तेच शब्द तोडून मोडून
Zigzag रूपात परत रचले

कविता चवदार करण्यासाठी
काही अगम्य गोष्टी मिसळल्या
जसं :-- "मिट्ट काळोखाच्या रात्री
उन्हाच्या त्या सावल्या दाटल्या",

“वसंतातली पानगळ, भाजणारं चांदण”,
“निस्तेज डोळ्यातली भेदक नजर”,
“रणरणत्या उन्हात थिजलेले रस्ते”,
“माझंच प्रेत माझ्याच खांद्यावर”,

“तिच्या ह्रुदयात सुकलेले अश्रू”,
“प्रतारणेतून डोकावे विश्वास”,
“प्रकाशझोत ये अंधारून”,
“कलेवराचे धगधगते उच्छ्वास”.

असल्या एक एक चीजा घालून
कवितेची Dish तयार झाली
शोभेसाठी मग तिच्यावर
विराम चिन्हं Garnish केली

आणि कुठल्याशा मासिकाला
त्याच दिवशी पाठवून दिली
आणि काय सांगू मित्रांनो
पुढ़च्याच महिन्यात छापून आली

मग काय ! अभिनंदनाचा वर्षाव !
सगळ्यानी माझी स्तुती केली
मराठीच काय अमराठी मित्रांनी
कविता माझी नावाजली

“Mind blowing”, “Superb”, “Awesome”
“बहोत बढ़िया”, “माशाल्ला”,
“सुंदर”, “अप्रतिम”, “अर्थपूर्ण”
कौतुकाने जीव गलबलला

कौतुकाची लाट ओसरली
मग जरा भानावर आलो
डोकं खाजवून विचार केला
आणि बुचकळ्यातच पडलो

तथाकथित कवितेचा अर्थ
अजून मलाच नाही कळला
फक्त एकदा वाचून (की पाहून ?) यांना
कसा काय तो उमगला ???????

........ उल्हास भिडे (४-९-०९)

4 comments:

 1. yaacha kaaranaamule mee aapalyaalaa kaahee lihoona dhaadale aahe
  aani ho aapana vayaane maazyaahoona vadeela aahaata
  charuchandra bhide

  ReplyDelete
 2. KAka,

  He mala JABBARDASTA aawadaleli kavita ahe.

  karan, EMINEM navacha ek "Rapper" artiest ahe.
  Tyachi kahi gaani aikun me khup bharawun gelelo aani ajunahi jato. Karan, to SAGALE SHABDA, YAMAK na julawata hi ek BEST gana lihu shakato. Jyat tumachya manatala pratyek shabda tumhi lihu shakatat.

  Mudyacha mhanje, tyachi gani aikun, me sudha tharavala, ki aapanahi 1 Rap song lihayacha.

  "Ti Mazi Pahili KavitA" karan, rap is like Fast reading Poetry. Aani ti lihitana kalala ki he khup kathin kaam ahe.

  Tyamule me jeva jeva konachya Pahlya kavita vachato, mala mazi ti wel aatavate.

  Tumachi kavita mazya 1st kavitepekasha Khupach chhan ahe.


  Yavar, tumachya pratikriyechi me vat pahatoy. Maza plz Orkut var scrap kara.

  Thank you.

  ReplyDelete
 3. आदि आणि संकेत,
  धन्यवाद !

  संकेत,
  नाव जरी तस असल तरी,
  ही कविता माझी पहिली कविता नाही.
  कवितेच्या नावाखाली काहीही
  (खास करून तुटक तुटक गद्य परिच्छेद)
  लिहिणार्‍या आणि त्याची उगाच स्तुती
  करणार्‍यांबाबत टीका करण्याच्या
  दृष्टीने ही कविता लिहिली.

  खर तर, ठरवून कधी काव्य लिहिता येत नाही,
  ते आपोआप सुचत.
  या blog वर ’कविता - शब्द आणि भावना’ हे वाच.
  म्हणजे मला काय म्हणायच आहे ते अधिक स्पष्ट होईल.

  धन्यवाद !

  ReplyDelete