Friday, July 31, 2009

सारेगमप - सप्तसुरांची मधुशालासारेगमप community वर Little-champs
पर्व सुरु असतांना post केले होते

Saturday, July 18, 2009

आई (असंभव)

असंभव community वर ३-२-०९ रोजी post केले होते
३/४ दिवासांपूर्वीचा प्रथमेश, मनीषाची आई, राधा, आणि चंदू
यांच्या भेटीचा तो प्रसंग, इतका ह्रुद्दय झाला, की खरोखरच
मन हेलावल. प्रत्येक पात्राचा अभिनय स्वाभाविक आणि
परिणामकारक
तसाच कालचा राधा, प्रथमेशला आई म्हणायला सांगते तो
प्रसंग --- अप्रतिम अभिनय राधा आणि प्रथमेशचाही
दोन्ही प्रसंग मनाला भिडले आणि काही लिहावस वाटल
मोडक्या तोडक्या शब्दात लिहिलय, केवळ दाद देण्यासाठी

--------------------- आई --------------------

------------------- चंदू : देवकी, कान्हा आणि यशोदा, भेट पाहता मन गहिवरले

------------------------ फिटे पारणे या डोळ्यांचे, अपूर्व दृश्या मी अनुभवले

मनीषाची आई (राधाला) : कळेच ना का तुझे लेकरू

----------------------- “आई” म्हणुनी मला बिलगते

----------------- राधा : ममतेची तव ओढ अनावर

----------------------- गत जन्माही साद घालते

----------------- राधा : नसे हाक ती जरि माझ्यास्तव, त्या हाकेची मीही भुकेली

----------------------- मजही संबोधावे तैसे, इच्छा उर्मी पुन्हा उसळली

----------------------- प्रथमेशाच्या* कृपाप्रसादे या जन्माचे सार्थक व्हावे

----------------------- एक मनीषा* एकदाच तरि मजला त्याने आई म्हणावे

-------------- प्रथमेश : जरी इच्छितो कृती घडेना मूक भावना समजुन घेई

----------------------- लंघुनी मर्यादा शरीराच्या म्हणेन तुजला ही मी आई

----------------------- आ ---- आ ----- ई ----- आई

(* Here प्रथमेश = Ganapatee & मनीषा = desire)

तनिष्काचे मनोगत (असंभव)तनिष्काचे मनोगत
असंभव communities वर ७-६-२००९ रोजी post केले होते
तनिष्काचे मनोगत
होते मी तर भरकटलेली
आत्म प्रौढितच गुरफटलेली
अगम्यतेचा कोष विणूनी
गेले होते त्यात गुंतुनी
कोषातिल त्या गूढ़ तमी मी कृष्ण रक्त रंगात रंगले
तरल भावना इंद्रधनुच्या रंगसप्तका मी त्याजियले
बंद दरवाजे उघडणे हाच माझा छंद होता
ना जगाची फिकिर होती विश्व माझे कोष होता

अवचित एक दिनी कोषाच्या अभेद्य भिंती थरथरल्या
आर्त साद ती पड़ता कानी सुप्त भावना जागृत झाल्या
आणि मग मी मलाच पुसले या सर्वातुन काय साधले
माता असुनी, अपत्य माझे का ममतेला वंचित झाले
दिव्य शक्तिच्या ध्यासापोटी आप्तजनां का मी अव्हेरले
गूढ़त्वाच्या राहु केतु नी मम मति इंदु कसे ग्रासले ?

विचारांति मग कोष भेदुनी मुक्त मोकळा श्वास घेतला
आणि तशातच जणु मंगलमय परिसस्पर्श तो मनास झाला
सांप्रत जन्मी पुनर्जन्म हा कल्पनेतही जरी असंभव
कर्मयोगी-सत्संगे नकळत माझ्या ठायी होई संभव
प्रेमभावना, वत्सलता अन् ममत्व मनि ते पुन्हा जागले
शुष्क काष्ठ ते आयुष्याचे अपत्य प्रेमे पुन्हा बहरले

अपत्य प्रेमे विचलित होता हित शत्रूने डाव साधला
माझ्याच करीचे शस्त्र घेउनी वर्मी माझ्या घाव घातला
जायबंदी मी, अविचल तरि मी
खंबीर मी, मी संयमी
अटल मी, ढृढ़ निश्चयी मी
घायाळ तरिही अचल मी
जरी आजवरि शक्ती माझी वापरली संहार सहाय्या
त्याच शक्तिचा प्रयोग आता करेन मी स्वजनां रक्षाया
सशक्त मी, समर्थ मी
सक्षम मी, स्थिर बुद्धि मी
पूर्ण शक्तिने अन् बुद्धीने
लढेन मी, झुंजेन मीTuesday, July 7, 2009

प्रियाचे मनोगत (असंभव)

विक्रांत, प्रियाची पुनर्भेट
त्या भेटी नंतर प्रियाच्या मनातील विचार
एका गाण्याच्या रूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न
असं भव communities वर ५-११-०८ रोजी post केले होते


विक्रांतचे मनोगत (असंभव)

Monday, July 6, 2009

सुलेखाचे मनोगत (असंभव)

...... मनोगत ...... १-१०-०८ रोजी असंभव comms वर post केले होते
सुलेखा

नियतीचे घाव या अन् पूर्व जन्मी साहले
आलि हाती ना फुले पण कंटके रक्ताळिले
भक्षुनी माझ्या मुखीचा घास होई तृप्त कोणी
अन् क्षुधार्त मी तृषार्त राहिले या जीवनी

अन् अचानक एक दिवशी जाणिले माझे मला मी
पूर्वजन्मीच्या स्मृतींनी उठविल्या प्रतिशोध उर्मी
धिंडवडे अब्रूचे काढिले जेव्हा कुणी
सूडाची आग मनी पेटलीच त्या क्षणी
त्या आगित या जन्मी जळले रे बंध पाश
एक ध्येय एक ध्यास करिन शत्रुचा विनाश

आता बस एक आस करिन त्यांस बेचिराख
मार्गी जो येई कुणी होइल तो जळुन खाक

पाहि ना त्यांच्या चिता पेटलेल्या जोवरी
सूडाग्नी धगधगेल तोवरी माझ्या उरी

Sunday, July 5, 2009

आजोबांचे मनोगत (असंभव)

असंभव पाहता पाहता, असंभवमय कधी झालो ते कळलच नाही.
गेल्या काही महिन्यांत मी असंभव बद्दल काही लिखाण केल आहे.
हे लिखाण मी ORKUT मधील विविध असंभव Communities
वर या आधीच पोस्ट केल आहे. लोकांना ते आवडले आहे.

मी लेखक / कवि यापैकी कोणीही नाही.
हे लिहिलय ते फक्त असंभवच्या प्रेमाखातर.
आणि म्हणुनच हे तुमच्या पुढे सादर करतो आहे.

...... मनोगत ......
एक कल्पना मनात आली :
असंभव मधील व्यक्तिरेखांनी आपले मनोगत व्यक्त केले तर ? …….


दीनानाथ शास्त्री :
(असंभव communities वर २६-९-०८ रोजी post केले होते)
का अवतरली पुन्हा एकदा जुनीच पात्रे या मंचावर
ग्रह-तार्यांची गणिते मांडुन का न मिळतसे याचे उत्तर
गत जन्मीच्या अपूर्ण इच्छा आली का ती पूर्ण कराया
कुणी आली विध्वंस कराया येती कुणि आप्तां रक्षाया
अतर्क्य, अगम्य नि गूढ़ असे हे सावट पसरे दुःशक्तीचे
हिंस्त्र कामना पूर्तीस्तव ते घोट घेतसे अस्तित्वाचे
जरि हादरले, ना डगमगले प्रियजन माझे अचल राहिले
अस्तित्व जपाया परिवाराचे युद्ध कराया सिद्ध जाहले

भेद विसरुनी सज्ज जाहले स्वकीय माझे संघर्षास्तव
एकसंध एकत्र होउनि असंभवाला करण्या संभव
श्रीरामा तुज एक सांगणे एक मागणे, एक साकडे
देइ संकटे कितिही तू पण संघर्षास्तव बलही तू दे

………….. संघर्षास्तव बलही तू दे ……. श्रीराम श्रीराम

उखाणे ..... सीरियल मधील पात्रांचे

२००८ सालातील गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी
zee Marathi च्या serial मधील पात्रांसाठी उखाणे
लिहिण्याच मनात आल आणि गणपतीच्या आशिर्वादाने
उखाणे सुचत गेले.

Zee Marathi या ORKUT comm. वर ३-९-०८ रोजी
post केले, अनेक लोकांना ते आवडले.

नंतर नोव्हेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र टाईम्स ते प्रसिद्द झाले होते.


उखाणे ..... सीरियल मधील पात्रांचे

आसावरी : (अवघाची संसार)
आले मी चंद्रपुरात, सोडून आमची अष्टी
हर्षवार्धानांच्या सहवासात, झाले दुक्खी कष्टी
हर्षदा : (अवघाची संसार)
पंढरपुरच्या देवळात, उभा विठ्ठल सावळा
भावाच्या धाकात राहून, आदित्य झाला बावळा
सरिता : (या सुखांनो या)
हाकारिण्या सुखांना, धरला अभयचा हात
सुखे दूर पळती, होती, दुक्खांचे आघात
मधुरा : (कळत नकळत)
नाव कुणाचे घेऊ, विशाल गौरव की भूषण
नकळत सारे घडते, देऊ कुणा मी दूषण
शुभ्रा : (असंभव)
पडतायत मला स्वप्न, जाणवातोय धोका
आदिनाथांच्या भोवती, सुलेखाचा विळखा
सुलेखा : (असंभव)
गतजन्मीची इच्छा, या जन्मी पुरी करीन
करीन आधी माझा, मग आदिला मारीन
सोपान : (असंभव)
सर्व शास्त्र्यांच्या गळ्यात, घालू फासाचे फन्दे
खजिना मिळवू ऐष करू , ये लवकर ये इंदे
यामिनी : (वहिनीसाहेब)
मार्गात माझ्या येईल जो, त्याला त्याला ठेचीन
भय्या साहेबांना झुकवीन, नि वाहिनी साहेब होईन
जानकी : (वहिनीसाहेब)
किर्लोस्करांच्या साम्राज्याची, घालवेन मी रया
सोडणार नाही तुला सुद्धा, बघून घेईन जया

सगळे उखाणे घेतायत हे पाहून त्या येड्या अक्षयने (कळत नकळत)
त्याच्या आईला (मातेला) उखाणा घायचा खूप आग्रह केला
ती भडकली, पण उखाणा घेतला तिने :
अक्षयची आई : (कळत नकळत)
फुटक्या तुझ्या नशिबानं, बा तुझा गेला
मुडदा बशिवला तुझा, नाव घे सांगतोय मला


हर्षवर्धन: (अवघाची संसार)
एक रुसे-फुगे , दुसरी blackmail करी
सांभाळून मला घेणारी, आसावरीच बरी
अंतरा : (अवघाची संसार)
मुखडा बदलला गीत विरले अंतरा ही हरवला
निगराणीने नरेशांच्या मोगरा हा बहरला
विष्णु : (असंभव)
आलं अनेकदा मनात, लग्न पहाव करून
दोन म्हातारे सांभाळताना, वय गेलं सरून
विष्णु : (असंभव)
गंडांतर येतात भुतं दिसतात, सरलं वाड्याच वैभव
माझं आता लग्न होण .... असंभव ! असंभव !!
विशाल : (कळत नकळत)
अधरांजवळी येता येता; कडू होई शर्करा
सन्निध जाता दूर पळतसे; का माझी मधुरा
अभय : (या सुखानों या)
असो सुखाचा हा प्याला; अर्ध, पूर्ण वा रिता
परी, पूर्ण मज साथ देतसे; अर्धांगिनी सरिता
प्रिया : (असंभव)
खुळी किती मी - उगा भांडले; मन करते आकांत
अपूर्ण चित्रा पूर्ण कराया; परतुनी या विक्रांत
हर्षवर्धन (अवघाची संसार) :
स्वैराचाराच्या आड, येई लग्नाची बेडी
मुक्त होईन ठरवून, आसावरीला वेडी
आसावरी (अवघाची संसार) :
रोजच तमाशा, रोज नाटक, रोज फार्स
काय म्हणू 'ह्यांना', हर्ष की harsh ?

गणेश वंदन


वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा