Sunday, July 5, 2009

आजोबांचे मनोगत (असंभव)

असंभव पाहता पाहता, असंभवमय कधी झालो ते कळलच नाही.
गेल्या काही महिन्यांत मी असंभव बद्दल काही लिखाण केल आहे.
हे लिखाण मी ORKUT मधील विविध असंभव Communities
वर या आधीच पोस्ट केल आहे. लोकांना ते आवडले आहे.

मी लेखक / कवि यापैकी कोणीही नाही.
हे लिहिलय ते फक्त असंभवच्या प्रेमाखातर.
आणि म्हणुनच हे तुमच्या पुढे सादर करतो आहे.

...... मनोगत ......
एक कल्पना मनात आली :
असंभव मधील व्यक्तिरेखांनी आपले मनोगत व्यक्त केले तर ? …….


दीनानाथ शास्त्री :
(असंभव communities वर २६-९-०८ रोजी post केले होते)
का अवतरली पुन्हा एकदा जुनीच पात्रे या मंचावर
ग्रह-तार्यांची गणिते मांडुन का न मिळतसे याचे उत्तर
गत जन्मीच्या अपूर्ण इच्छा आली का ती पूर्ण कराया
कुणी आली विध्वंस कराया येती कुणि आप्तां रक्षाया
अतर्क्य, अगम्य नि गूढ़ असे हे सावट पसरे दुःशक्तीचे
हिंस्त्र कामना पूर्तीस्तव ते घोट घेतसे अस्तित्वाचे
जरि हादरले, ना डगमगले प्रियजन माझे अचल राहिले
अस्तित्व जपाया परिवाराचे युद्ध कराया सिद्ध जाहले

भेद विसरुनी सज्ज जाहले स्वकीय माझे संघर्षास्तव
एकसंध एकत्र होउनि असंभवाला करण्या संभव
श्रीरामा तुज एक सांगणे एक मागणे, एक साकडे
देइ संकटे कितिही तू पण संघर्षास्तव बलही तू दे

………….. संघर्षास्तव बलही तू दे ……. श्रीराम श्रीराम

No comments:

Post a Comment