Monday, July 6, 2009

सुलेखाचे मनोगत (असंभव)

...... मनोगत ...... १-१०-०८ रोजी असंभव comms वर post केले होते
सुलेखा

नियतीचे घाव या अन् पूर्व जन्मी साहले
आलि हाती ना फुले पण कंटके रक्ताळिले
भक्षुनी माझ्या मुखीचा घास होई तृप्त कोणी
अन् क्षुधार्त मी तृषार्त राहिले या जीवनी

अन् अचानक एक दिवशी जाणिले माझे मला मी
पूर्वजन्मीच्या स्मृतींनी उठविल्या प्रतिशोध उर्मी
धिंडवडे अब्रूचे काढिले जेव्हा कुणी
सूडाची आग मनी पेटलीच त्या क्षणी
त्या आगित या जन्मी जळले रे बंध पाश
एक ध्येय एक ध्यास करिन शत्रुचा विनाश

आता बस एक आस करिन त्यांस बेचिराख
मार्गी जो येई कुणी होइल तो जळुन खाक

पाहि ना त्यांच्या चिता पेटलेल्या जोवरी
सूडाग्नी धगधगेल तोवरी माझ्या उरी

No comments:

Post a Comment