Sunday, July 5, 2009

उखाणे ..... सीरियल मधील पात्रांचे

२००८ सालातील गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी
zee Marathi च्या serial मधील पात्रांसाठी उखाणे
लिहिण्याच मनात आल आणि गणपतीच्या आशिर्वादाने
उखाणे सुचत गेले.

Zee Marathi या ORKUT comm. वर ३-९-०८ रोजी
post केले, अनेक लोकांना ते आवडले.

नंतर नोव्हेंबर २००८ मध्ये महाराष्ट्र टाईम्स ते प्रसिद्द झाले होते.


उखाणे ..... सीरियल मधील पात्रांचे

आसावरी : (अवघाची संसार)
आले मी चंद्रपुरात, सोडून आमची अष्टी
हर्षवार्धानांच्या सहवासात, झाले दुक्खी कष्टी
हर्षदा : (अवघाची संसार)
पंढरपुरच्या देवळात, उभा विठ्ठल सावळा
भावाच्या धाकात राहून, आदित्य झाला बावळा
सरिता : (या सुखांनो या)
हाकारिण्या सुखांना, धरला अभयचा हात
सुखे दूर पळती, होती, दुक्खांचे आघात
मधुरा : (कळत नकळत)
नाव कुणाचे घेऊ, विशाल गौरव की भूषण
नकळत सारे घडते, देऊ कुणा मी दूषण
शुभ्रा : (असंभव)
पडतायत मला स्वप्न, जाणवातोय धोका
आदिनाथांच्या भोवती, सुलेखाचा विळखा
सुलेखा : (असंभव)
गतजन्मीची इच्छा, या जन्मी पुरी करीन
करीन आधी माझा, मग आदिला मारीन
सोपान : (असंभव)
सर्व शास्त्र्यांच्या गळ्यात, घालू फासाचे फन्दे
खजिना मिळवू ऐष करू , ये लवकर ये इंदे
यामिनी : (वहिनीसाहेब)
मार्गात माझ्या येईल जो, त्याला त्याला ठेचीन
भय्या साहेबांना झुकवीन, नि वाहिनी साहेब होईन
जानकी : (वहिनीसाहेब)
किर्लोस्करांच्या साम्राज्याची, घालवेन मी रया
सोडणार नाही तुला सुद्धा, बघून घेईन जया

सगळे उखाणे घेतायत हे पाहून त्या येड्या अक्षयने (कळत नकळत)
त्याच्या आईला (मातेला) उखाणा घायचा खूप आग्रह केला
ती भडकली, पण उखाणा घेतला तिने :
अक्षयची आई : (कळत नकळत)
फुटक्या तुझ्या नशिबानं, बा तुझा गेला
मुडदा बशिवला तुझा, नाव घे सांगतोय मला


हर्षवर्धन: (अवघाची संसार)
एक रुसे-फुगे , दुसरी blackmail करी
सांभाळून मला घेणारी, आसावरीच बरी
अंतरा : (अवघाची संसार)
मुखडा बदलला गीत विरले अंतरा ही हरवला
निगराणीने नरेशांच्या मोगरा हा बहरला
विष्णु : (असंभव)
आलं अनेकदा मनात, लग्न पहाव करून
दोन म्हातारे सांभाळताना, वय गेलं सरून
विष्णु : (असंभव)
गंडांतर येतात भुतं दिसतात, सरलं वाड्याच वैभव
माझं आता लग्न होण .... असंभव ! असंभव !!
विशाल : (कळत नकळत)
अधरांजवळी येता येता; कडू होई शर्करा
सन्निध जाता दूर पळतसे; का माझी मधुरा
अभय : (या सुखानों या)
असो सुखाचा हा प्याला; अर्ध, पूर्ण वा रिता
परी, पूर्ण मज साथ देतसे; अर्धांगिनी सरिता
प्रिया : (असंभव)
खुळी किती मी - उगा भांडले; मन करते आकांत
अपूर्ण चित्रा पूर्ण कराया; परतुनी या विक्रांत
हर्षवर्धन (अवघाची संसार) :
स्वैराचाराच्या आड, येई लग्नाची बेडी
मुक्त होईन ठरवून, आसावरीला वेडी
आसावरी (अवघाची संसार) :
रोजच तमाशा, रोज नाटक, रोज फार्स
काय म्हणू 'ह्यांना', हर्ष की harsh ?

No comments:

Post a Comment