Wednesday, September 15, 2010

पहिले चुंबन

पहिले चुंबन

अधीरतेने आज गायिले, थरथरणार्‍या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने

सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)

7 comments:

  1. वा! सुंदर जमलीये कविता. शृंगारिक वाटत नाही.

    ReplyDelete
  2. "शब्दाविण संवाद उमगले"

    Terrific !!!!!!!!

    ReplyDelete
  3. कांचन आणि विक्रांत
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. Wow !
    How romantic, at the same time controlled expressions, very subtle.
    Very nice.
    shashank

    ReplyDelete
  5. "या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
    अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले"
    क्या बात है! अप्रतिम!!!

    ReplyDelete
  6. वीरेंद्र,
    धन्यवाद !

    ReplyDelete