Friday, October 8, 2010

साकडं

साकडं

काढून ठेवलेल्या चपलांबरोबर
विकारांची वस्त्र
तात्पुरती का होईना,
देवळाबाहेर उतरवून …..
तुझे भक्त
जेव्हा तुझ्या मूर्तीच्या दर्शनात
मग्न असतात,
तेव्हा .... हळूच देवळाबाहेर येऊन
गोकुळचा कान्हा होऊन
ने चोरून
ती सारी वस्त्रं
आणि कर अग्नीच्या हवाली….
…….मग बघ,
दिसू लागशील त्यांना तू
देवळात
आणि देवळाबाहेरही.
देवा ! .....
..... करशील का रे एवढं माझ्यासाठी ?

….. उल्हास भिडे (८-१०-२०१०)

1 comment:

  1. वा काका,
    काय अप्रतिम कविता झाली आहे . अतिशय अर्थपूर्ण व सहजसुंदर. तुम्ही म्हटले आहे तसे विकारांची वस्त्रे त्याने भस्मसात केली तर काय बहार होईल !
    शशांक

    ReplyDelete